मराठी अभंग - संत नामदेव - पंढरीचा राजा उभा भक्तकाजा

॥ पंढरीचा राजा उभा भक्तकाजा ॥

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा ।
उभारुनि भुजा वाट पाहे ॥१॥

घ्यारे नाम सुखें प्रेमें अलौकिक ।
साधनें आणिक करुं नका ॥२॥

मनाचेनि मनें ह्रदयीं मज धरा ।
वाचेनें उच्‍चारा नाम माझें ॥३॥

बोलोनियां ऐसे उभा भीमातीरीं ।
नामा निरंतरी चरणापाशीं ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.