मराठी अभंग - संत नामदेव - पंढरीचा वास, चंद्रभागे स्‍नान

॥ पंढरीचा वास, चंद्रभागे स्‍नान ॥

पंढरीचा वास, चंद्रभागे स्‍नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥

हेची घडो मज जन्मजन्मांतरी ।
मागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥

मुखी नाम सदा संतांचे दर्शन ।
जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥

नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ।
कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.