मराठी अभंग - संत नामदेव - रूपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा

॥ रूपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा ॥

रूपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा ।
सखिये स्वप्‍नी शोभा देखियेला ॥१॥

शंख-चक्र-गदा शोभती चहु करीं ।
सखिये गरुडावरी देखियेला ॥२॥

पीतांबर कटि दिव्य चंदन उटी ।
सखिये जगजेठी देखियेला ॥३॥

विचारता मानसी नये जो व्यक्तीसी ।
नामा केशवेसी लुब्धोनी गेला ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.