मराठी अभंग - संत नामदेव - वैष्णवां घरीं सर्वकाळ

॥ वैष्णवां घरीं सर्वकाळ ॥

वैष्णवां घरीं सर्वकाळ ।
सदा झणझणिती टाळ ॥१॥

कण्या भाकरीचें खाणें ।
गांठी रामनाम नाणें ॥२॥

बैसावयासी कांबळा ।
द्वारी तुळसी रंगमाळा ॥३॥

घरीं दुभे कामधेनु ।
तुपावरी तुळसी पानु ॥४॥

फराळासी पीठ लाह्या ।
घडीघडी पडती पायां ॥५॥

नामा म्हणे नेणती कांहीं ।
चित्त अखंड विठ्ठलापायीं ॥६॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.