मराठी अभंग - संत नामदेव - विठ्ठल आवडी प्रेमभावो

॥ विठ्ठल आवडी प्रेमभावो ॥

विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥

तुटला हा संदेहो ।
भवमूळ व्याधीचा ॥२॥

म्हणा नरहरी उच्‍चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार ।
संसार करावया प्रेमभावो ॥३॥

नेणो नामाविण काही ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही ।
विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.