आणिक दुसरें मज नाहीं आतां ।
नेमिलें या चित्तापासुनियां ॥१॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनीं ।
जागृतीं स्वप्नीं पांडुरंग ॥२॥
पडिलें वळण इंद्रियां सकळां ।
भाव तो निराळा नाहीं दुजा ॥३॥
तुका म्हणे नेत्रीं केलीं ओळखण ।
साजिरें तें ध्यान विटेवरी ॥४॥
संत तुकाराम अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई