मराठी अभंग - संत तुकाराम - आतां कोठें धांवे मन ।

॥ आतां कोठें धांवे मन । ॥

आतां कोठें धांवे मन ।

तुझे चरण देखिलिया ॥१॥

भाग गेला सीण गेला ।

अवघा जाला आनंद ॥२॥

प्रेमरसें बैसली मिठी ।

आवडी लाठी मुखाशी ॥३॥

तुका म्हणे आम्हां जोगें ।

विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.