मराठी अभंग - संत तुकाराम - अगा करुणाकरा करितसें धांवा

॥ अगा करुणाकरा करितसें धांवा ॥

अगा करुणाकरा करितसें धांवा ।

या मज सोडवा लवकरी ॥१॥

ऐकोनियां माझी करुणेचीं वचनें ।

व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥

मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव ।

ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥

उशीर तो आतां न पाहिजे केला ।

अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥

उरलें तें एक हें चि मज आतां ।

अवघें विचारितां शून्य जालें ॥५॥

तुका म्हणे आतां करीं कृपा दान ।

पाऊलें समान दावीं डोळां ॥६॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.