मराठी अभंग - संत तुकाराम - अमृताचीं फळें अमृताची वेली

॥ अमृताचीं फळें अमृताची वेली ॥

अमृताचीं फळें अमृताची वेली ।

ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥

ऐसियांचा संग देइ नारायणा ।

बोलावा वचना जयांचिया ॥२॥

उत्तम सेवन सितळ कंठासी ।

पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥३॥

तुका म्हणे तैसें होइजेत संगें ।

वास लागे अंगें चंदनाच्या ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.