आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥
संत तुकाराम अभंग
- वाटीभर विष दिले प्रल्हादासी । निर्भय मानसी तुझ्या बळे
- कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता
- सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया
- गरुडाचे वारिके कासे पीतांबर । सांवळे मनोहर कै देखेन
- काय या संतांचे मानूं उपकार
- पावलों पंढरी वैकुंठभुवन
- अवघा तो शकुन
- कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावी हरी
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई