मराठी अभंग - संत तुकाराम - अशक्य तों तुम्हां नाही नारायणा

॥ अशक्य तों तुम्हां नाही नारायणा ॥

अशक्य तों तुम्हां नाही नारायणा ।

निर्जिवा चेतना आणावया ॥१॥

मागें काय जाणों स्वामीचे पवाडे ।

आतां कां रोकडे दावूं नये ॥२॥

थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे ।

म्हणवितों दास काय थोडें ॥३॥

तुका म्हणे माझे निववावे डोळे ।

दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥४॥

शंखचक्रगदापद्म ।

पैल आला पुरुषोत्तम ॥५॥

ना भी ना भी भक्तराया ।

वेगीं पावालों सखया ॥६॥

दुरूनि येतां दिसे दृष्टी ।

धाकें दोष पळती सृष्टी ॥७॥

तुका देखोनि एकला ।

वैकुंठीहूनि हिर आला ॥८॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.