मराठी अभंग - संत तुकाराम - चला पंढरीसी जाऊं

॥ चला पंढरीसी जाऊं ॥

चला पंढरीसी जाऊं ।

रखमादेवीवरा पाहूं ॥१॥

डोळे निवतील कान ।

मना तेथें समाधान ॥२॥

संता महंता होतील भेटी ।

आनंदे नाचों वाळवंटी ॥३॥

तें तीर्थांचे माहेर ।

सर्व सुखाचें भांडार ॥४॥

जन्म नाही रे आणीक ।

तुका म्हणे माझी भाक ॥५॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.