मराठी अभंग - संत तुकाराम - दाटे कंठ लागे डोळियां पाझर

॥ दाटे कंठ लागे डोळियां पाझर ॥

दाटे कंठ लागे डोळियां पाझर ।

गुणाची अपार वृष्टी वरी ॥१॥

तेणें सुखें छंदें घेईन सोंहळा ।

होऊनि निराळा पापपुण्यां ॥२॥

तुझ्या मोहें पडो मागील विसर ।

आलापें सुस्वर करिन कंठ ॥३॥

तुका म्हणे येथें पाहिजे सौरस ।

तुम्हांविण रस गोड नव्हे ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.