धांव घालीं माझें आईं ।
आतां पाहतेसी काईं ॥१॥
धीर नाहीं माझे पोटीं ।
जालें वियोगें हिंपुटीं ॥२॥
करावें सीतळ ।
बहु जाली हळहळ ॥३॥
तुका म्हणे डोईं ।
कधीं ठेवीन हे पायीं ॥४॥
संत तुकाराम अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई