मराठी अभंग - संत तुकाराम - धन्य आजि दिन

॥ धन्य आजि दिन ॥

धन्य आजि दिन ।

जालें संतांचें दर्शन ॥१॥

जाली पापा-तापा तुटी ।

दैन्य गेलें उठाउठीं ॥२॥

जाले समाधान ।

पायीं विसावलें मन ॥३॥

तुका म्हणे आले घरा ।

तोचि दिवाळी दसरा ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.