मराठी अभंग - संत तुकाराम - धन्य ती पंढरी धन्य भीमातीर

॥ धन्य ती पंढरी धन्य भीमातीर ॥

धन्य ती पंढरी धन्य भीमातीर ।

आणिंयेलें सार पुंडलिकें ॥१॥

धन्य तो हि लोक अवघा दैवांचा ।

सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥२॥

धन्य ते ही भूमी धन्य तरुवर ।

धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥३॥

धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान ।

आनंदे भुवन गर्जतसे ॥४॥

धन्य पशु-पक्षी-कीटक-पाषाण ।

अवघा नारायण अवतरला ॥५॥

तुका म्हणे धन्य संसारातें आलीं ।

हरिरंगी रंगली सर्वभावें ॥६॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.