मराठी अभंग - संत तुकाराम - गरुडाचे वारिके कासे पीतांबर ।  सांवळे मनोहर कै देखेन

॥ गरुडाचे वारिके कासे पीतांबर ।  सांवळे मनोहर कै देखेन ॥

गरुडाचे वारिके कासे पीतांबर । 
सांवळे मनोहर कै देखेन ॥१॥ 
बरवया बरवंटा घनमेघ सावळा । 
वैजयंतीमाळा गळा शोभे ॥२॥ 
मुकुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ ।
कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ॥३॥ 
श्रवणी कुंडले नक्षत्रे शोभती ।
रत्नप्रभा दीप्ती दंतावळी ॥४॥
ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ । 
वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ॥५॥
उध्दव अक्रूर उभे दोही कडे । 
वर्णिती पवाडे सनकादिक ॥६॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा ।
तोची माझा सखा पांडुरंग ॥७॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.