मराठी अभंग - संत तुकाराम - घेई घेई माझे वाचे

॥ घेई घेई माझे वाचे ॥

घेई घेई माझे वाचे ।

गोड नाम विठोबाचें ॥१॥

तुम्ही घ्या रे डोळे सुख ।

पहा विठोबाचें मुख ॥२॥

तुम्ही ऐका रे कान ।

माझ्या विठोबाचें गुण ॥३॥

मना तेथें धांव घेई ।

राहें विठोबाचे पायी ॥४॥

रूपी गुंतले लोचन ।

पायी स्थिरावले मन ॥५॥

देहभाव हरपला ।

तुज पाहता विठ्ठला ॥६॥

तुका म्हणे जीवा ।

नको सोडूं या केशवा ॥७॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.