मराठी अभंग - संत तुकाराम - जन विजन जालें आम्हा

॥ जन विजन जालें आम्हा ॥

जन विजन जालें आम्हा ।

विठ्ठलनामा प्रमाणे ॥१॥

पाहें तिकडे मायबाप ।

विठ्ठल आहे रखुमाई ॥२॥

वन पट्टण एकभाव ।

अवघा ठाव सरता जाला ॥३॥

आठव नाहीं सुखदु:खा ।

नाचे तुका कौतुकें ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.