जाऊं देवाचिया गांवां ।
घेऊ तेथे चि विसांवा ॥१॥
देवा सांगों सुख-दुःख ।
देव निवारील भूक ॥२॥
घालूं देवासी च भार ।
देव सुखाचा सागर ॥३॥
राहों जवळी देवापाशीं
आतां जडोनि पायांसी ॥४॥
तुका म्हणे आम्ही बाळें
या देवाचीं लडिवाळें ॥५॥
संत तुकाराम अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई