मराठी अभंग - संत तुकाराम - जे का रंजले गांजले

॥ जे का रंजले गांजले ॥

जे का रंजले गांजले ।

त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥

तो चि साधु ओळखावा ।

देव तेथें चि जाणावा ॥२॥

मृदु सबाह्य नवनीत ।

तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥

ज्यासि अपंगिता नाही ।

त्यासि धरी जो हृदयी ॥४॥

दया करणें जें पुत्रासी ।

ते चि दासा आणि दासी ॥५॥

तुका म्हणे सांगू किती ।

त्या चि भगवंताच्या मूर्ति ॥६॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.