मराठी अभंग - संत तुकाराम - जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती

॥ जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ॥

जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।

चालविसी हातीं धरुनियां ॥१॥

चालों वाटे आम्हीं तुझा चि आधार ।

चालविसी भार सवें माझा ॥२॥

बोलों जातां बरळ करिसी तें नीट ।

नेली लाज धीट केलों देवा ॥३॥

अवघें जन मज जाले लोकपाळ ।

सोईरे सकळ प्राणसखे ॥४॥

तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें ।

जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥५॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.