कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज ।
वर्म दावीं मज याचकासी ॥१॥
कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा ।
कोण्या भावें देवा आतुडसी ॥२॥
कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं ।
जाणूं हा कवण कैसा तुज ॥३॥
कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्ती ।
कैसी स्थिती मती दावी मज ॥४॥
तुका म्हणे जैसें दास केले देवा ।
तैसें हें अनुभवा आणीं मज ॥५॥
संत तुकाराम अभंग
- कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता
- दाटे कंठ लागे डोळियां पाझर
- वाटीभर विष दिले प्रल्हादासी । निर्भय मानसी तुझ्या बळे
- गरुडाचे वारिके कासे पीतांबर । सांवळे मनोहर कै देखेन
- ऐसे कैसे जाले भोंदू
- सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया
- नामाचे सामर्थ्य का रे दवडीसी । का रे विसरसी पवाडे हे
- खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई