मराठी अभंग - संत तुकाराम - कमोदिनी काय जाणे तो परिमळ

॥ कमोदिनी काय जाणे तो परिमळ ॥

कमोदिनी काय जाणे तो परिमळ ।

भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥

तैसें तुज ठावें नाही तुझें नाम ।

आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥२॥

माते तृण बाळा दुधाचि ते गोडी ।

ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥३॥

तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं ।

नाही त्याची भेटी भोग तीये ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.