मराठी अभंग - संत तुकाराम - कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावी हरी

॥ कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावी हरी ॥

कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावी हरी ॥१॥

ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसे रूप हरी दावी डोळा ॥२॥ 

कटी पीतांबर कास मिरवली । दाखवी वहिली ऐसी मूर्ती ॥३॥ 

गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवे मानसी तेची रूप ॥४॥

झुरोनी पांजरा होऊ पाहे आता ।येई पंढरीनाथा भेटावया ॥५॥

तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करू नये ॥६॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.