मराठी अभंग - संत तुकाराम - काय तुझे उपकार पांडुरंगा

॥ काय तुझे उपकार पांडुरंगा ॥

काय तुझे उपकार पांडुरंगा ।

सांगो मी या जगामाजी आतां ॥१॥

जतन हें माझें करोनि संचित ।

दिलें अवचित आणूनियां ॥२॥

घडलिया दोषांचे न घाली भरी ।

आली यास थोरी कृपा देवा ॥३॥

नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं ।

न मागतां पाहीं दान दिलें ॥४॥

तुका म्हणे याच्या उपकारासाटीं ।

नाहीं माझें गाठीं कांही एंक ॥५॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.