मराठी अभंग - संत तुकाराम - काय या संतांचे मानूं उपकार

॥ काय या संतांचे मानूं उपकार ॥

काय या संतांचे मानूं उपकार ।

मज निरंतर जागविती ॥१॥

काय द्यावें यांसी व्हावें उतराई ।

ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥२॥

सहज बोलणें हित उपदेश ।

करूनि सायास शिकविती ॥३॥

तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्तीं ।

तैसे मज येथ सांभाळिती ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.