मराठी अभंग - संत तुकाराम - खेळ मांडीयेला वाळवंटी घाई

॥ खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ॥

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।

नाचती वैष्णव भाईं रे ।

क्रोध अभिमान गेला पावटणी ।

एक एका लागतील पायीं रे ॥१॥

गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा

हार मिरविती गळां ।

टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव ।

अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥

वर्णअभिमान विसरली याती

एकएकां लोटांगणीं जाती ।

निर्मळ चित्तें जालीं नवनीतें ।

पाषाणा पाझर सुटती रे ॥३॥

होतो जयजयकार गर्जत अंबर

मातले हे वैष्णव वीर रे ।

तुका म्हणे सोपी केली पायवाट ।

उतरावया भवसागर रे ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.