मराठी अभंग - संत तुकाराम - पावलों पंढरी वैकुंठभुवन

॥ पावलों पंढरी वैकुंठभुवन ॥

पावलों पंढरी वैकुंठभुवन ।

धन्य अजि दिन सोनियाचा ॥१॥

पावलों पंढरी आनंदगजरें ।

वाजतील तुरें शंख भेरी ॥२॥

पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं ।

संत या सज्जनीं निवविलों ॥३॥

पावलों पंढरी पार नाहीं सुखा ।

भेटला हा सखा मायबाप ॥४॥

पावलों पंढरी येरझार खुंटली ।

माउली वोळली प्रेमपान्हा ॥५॥

पावलों पंढरी आपुले माहेर ।

नाहीं संवसार तुका म्हणे ॥६॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.