मराठी अभंग - संत तुकाराम - श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा

॥ श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा ॥

श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा ॥१॥

सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा ।

महानंदा महानुभावा । सदाशिवा सहजरूपा ॥२॥

अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना ।

वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥३॥

तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं ।

हे चि करीतसें विनवणी । भवबंधनीं सोडवावें ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.