मराठी अभंग - संत तुकाराम - सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।  कर कटावरी ठेवुनिया

॥ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।  कर कटावरी ठेवुनिया ॥

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । 
कर कटावरी ठेवुनिया ॥१॥ 
तुळसी हार गळा कासे पीतांबर । 
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥

मकर कुंडले तळपती श्रवणी । 
कंठी कौस्तुभमणी विराजित ॥२॥
तुळसी हार गळा कासे पीतांबर । 
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । 
पाहीन श्रीमुख आवडीने ॥३॥
तुळसी हार गळा कासे पीतांबर । 
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.