मराठी अभंग - संत तुकाराम - उठा सकळ जन उठिले नारायण

॥ उठा सकळ जन उठिले नारायण ॥

उठा सकळ जन उठिले नारायण ।

आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥

करा जयजयकार वाद्यांचा गजर ।

मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥२॥

जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर ।

पायावरी शिर ठेवूनियां ॥३॥

तुका म्हणे काय पढियंते तें मागा ।

आपुलालें सांगा सुख दुखे ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.